लासलगाव : 16 गाव पाणीपुरवठा योजने संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन सादर

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन –    लासलगाव सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेला लागलेली सततची घर यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निफाड पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवा सुराशे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना मुंबई येथे गुरुवारी निवेदन देण्यात आले.

निवेदना चा असे असा की सोळा गाव पाणी पुरवठा योजना ही 1995 साली मंजूर करण्यात आलीहोती. परंतु कास्टिंग पाईप ही जुने झाल्यामुळे सतत लिकेज होत असते, शिवाय एक्सप्रेस फिडर असूनही वारंवार वीज पुरवठा खंडित होणे या कारणांमुळे 16 गाव पाणीपुरवठा योजनेला वारंवार पाणीपुरवठा खंडीत होत आहे.

यावर्षी मुबलक पाऊस होऊनही आईन पावसाळ्यामध्ये लाभार्थी गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे.  मुंबई येथे गेलेल्या शिष्टमंडळाला सोळा गाव पाणी योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून जल जीवन मिशन पाणी योजनेअंतर्गत तातडीने यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला नामदार पाटील यांनी दिले.

यावेळी निफाड पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवा सुराशे रविराज शिंदे, तेजस गीते ,भावेश बर्वे उपस्थित होते.