लासलगाव : कांद्याने भरलेला ट्रक पलटी

लासलगाव :  पोलीसनामा ऑनलाइन  –  विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव रेल्वे गेट जवळील रस्त्याच्या कडेची साईड पट्ट्या नसल्याने कांद्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या खाली उतरल्याने पलटी झाल्याची घटना सोमवारी उशिरा रात्री घडली यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली जरी नसेल मात्र कांदा व ट्रकचे मोठे नुकसान झाले

लासलगाव येथून रेल्वे मालगाडीने बांगलादेशात कांदा निर्यात सुरु असल्याने रेल्वे मालगाडीने कांदा पाठवण्यासाठी सटाणा येथील व्यापाऱ्यांचा कांदा MH 41 G 5726 या मालट्रक मधून लासलगाव येथे घेऊन येत असताना विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव रेल्वे गेट जवळील रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या नसल्याने एक ते दीड फुटाची खाली निर्माण झाल्याने कांद्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या खाली उतरल्याने पलटी झाल्याची घटना सोमवार उशिरा रात्री घडली याअगोदर एक कंटेनर वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी पलटी होत एक टपरीचे मोठे नुकसान झाले होते मात्र या दोन्ही घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही पण निफाड सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या कडेच्या साईट पट्ट्या भरण्यासाठी कोणाचा जीव जाण्याची वाट पहात आहे का असा सवाल वाहनधारकांसह परिसरातील नागरिक करू लागले आहे