लासलगाव जळीत कांड : अखेर 7 दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली, शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील लासलगाव जळीतकांडातील पीडित महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेली पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. मुंबई येथील मसिना रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक वाजताच्या सुमारास पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पिडीतेचे नातेवाईकांनी तिचे अंत्यसंस्कार लासलगाव अमरधाम येथे करण्यात आला. या दरम्यान आरोपी रामेश्वर भागवत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लासलगाव येथील बस स्थानकांवर शनिवारी दिनांक (१५फेब्रुवारी) दुपारी कथित पती व विधवेच्या घरच्यांना झालेले दुसरे लग्न मान्य नसल्याच्या कारणाच्या वादातून झटापटीत पीडित महिला 67 टक्के भाजल्याची घटना घडली होती. लासलगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले. यात पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक व पेट्रोल देणाऱ्या कर्मचाऱ्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपी रामेश्वर यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रचंड पोलिस बंदोबस्त
लासलगाव येथील जळीत प्रकरणी पीडितेचा आज निधन झाल्याने तिचे अंत्यसंस्कार लासलगाव येथील अमरधाममध्ये करण्यात आले. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त अमरधाम मध्ये पिडीतेच्या आणि आरोपी भागवत याच्या घराजवळ तर विंचूर चौफुली वर प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मायेचे छत्र हरपले
दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर आज या चिमुकल्याच्या आईचेही दुर्दैवी निधन झाल्याने या ३ लहान चिमुकल्या मुलांचे छत्र हरपले आहे. आईचा मृतदेह पाहून लहान चिमुकले रडून-रडून हैराण झाले होते एकूणच लासलगाव येथील अमरधाम मधील परिस्थिती अत्यंत भेदरलेली असून मन हेलकावून टाकणारी दृश्य दिसत होते.

११.१५ मि झाला अंत्यसंस्कार
गेल्या सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या पिडितेची प्राणज्योत मावळली. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी पीडितेचा अंत्यसंस्कार येथील अमरधाममध्ये करण्यात आला.

You might also like