लासलगाव : मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती तरुणाच्या अंगलट

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  मद्यधुंद अवस्थेत नागाशी मस्ती निफाड तालुक्यातील नांदूरमध्येश्वर येथील तरुणांच्या अंगलट आल्याची घटना घडली आहे चार वेळा नागाने चावा घेतल्याने या तरुणांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर नाशिक येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मद्यधुंद अवस्थेत आपण काय करतो याचे मद्यपील्यानंतर अनेकांना भान राहत नाही अशीच एक घटना घडली आहे ती निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याने नागाशी मस्ती सुरू केल यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता मंगेश इतका नशेत होता की त्याने कमरेखालील पॅन्ट काढून फेकून दिली होती तो यावेळी अर्धनग्न अवस्थेत होता या मस्ती दरम्यान नागाने मंगेशला चार वेळा चावा घेतल चावा घेतल्याच्या रागात मंगेश ने नागाला हाताने ठेचून मारून टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी मंगेशला नागाने चार वेळा चावा घेतल्याने मंगेश ची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला निफाड येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे अद्यापही मंगेशची प्रकृतीही चिंताजनक असल्याने मंगेश हा मृत्यूशी झुंज देत आहे मद्यधुंद अवस्थेत आपण मृत्युवाशी मस्ती करतोय याचेसुद्धा या मंगेशला भान राहिले नसल्याचे या घटनेवरून सिद्ध होते