जम्मू-काश्मीर : सुरक्षा दलांना मोठं यश ! ‘लष्कर’च्या दहशतवादी मॉड्यूलचा ‘पर्दाफाश’, आतंकवादी ‘वानी’सह 4 मदतनीस अटकेत

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश लागले आहे. काश्मिरच्या बडगाममध्ये सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी जहूर वानी याला अटक केली आहे. सुरक्षा दलांनी जहूरकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.

या व्यतिरिक्त आणखी चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने चौकशीनंतर अटक केली आहे. हे सर्व लोक लष्कर दहशतवाद्यांना आश्रय देत असत आणि त्यांना रसद साहित्य पुरवत असत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा समूह गेल्या काही महिन्यांपासून या भागात सक्रिय होता.

जहूर आपल्या घरापासून दूर वनक्षेत्रात राहत होता. त्याच्या लपण्याची जागा पाहून सुरक्षा दलालाही आश्चर्य वाटले ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे ठेवण्यात आली होती. जहूर लष्कर हा फक्त अतिरेक्यांना रेशन आणि खाद्यपदार्थच पुरवत नसे तर त्यांच्या वाहतुकीची सोयदेखील करत होता. पोलिसांनी या सर्वांना अटक करुन तुरूंगात पाठविले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी पोलिसांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी जैश-ए-मोहम्मद अतिरेक्यांना अटक केली. अटक केलेले लोक जैश-ए-मोहम्मदच्या सक्रिय अतिरेक्यांना ख्रू आणि त्राल या जंगलात सुरक्षितता, उपकरणे आणि इतर मदत देत असत. शबीर अहमद, शीरज अहमद दार, शफत अहमद मीर आणि इश्फाक अहमद शाह अशी या व्यक्तींची नावे आहेत. हे सर्व लोक पुलवामा येथील अवंतीपुरा येथील ख्रु भागातील बाथन येथील आहेत.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांची कारवाई सातत्याने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने हंदवाडा येथे काही दहशतवाद्यांना ढेर केले होते. एवढेच नव्हे तर एका दहशतवाद्याला अटकही करण्यात आली.