थँक्स म्हणताच इंजिनियर तरुणीचे ‘चुंबन’ घेणाऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इंजिनियर तरुणीने मित्राला फोन करण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीचा फोन घेतला. फोन केल्यानंतर तो परत केला आणि तिने त्याला थँक्स म्हणत शेकहँड करताना तरुणीचा हात पकडून भररस्त्यात तिला त्याने किस केले. याप्रकऱणी एका नराधमाला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

राम बद्रीलाल दाबोडीया (वय ४३, रा. आझाद नगर वानवड़ी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हा प्रकार कॅम्प परिसरातील अरोरा टावर्स लगतच्या फुटपाथवर मंगळवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी बालेवाडी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईलधारक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी तरुणी कँप परिसरात मंगळवारी आली होती. परंतु ती रस्ता चुकली. बराच वेळ फिरल्यानंतर ती चुकीच्या मार्गावर फिरत होती. त्यानंतर तिचा मोबाइलही डिस्चार्ज झाला. दरम्यान तिला मित्राला फोन करून मदत घ्यायची होती. त्यामुळे ती अरोरा टॉवर लगत असलेल्या फुटपाथवर आल्यावर एका व्यक्तीकडे तिने मोबाईल मागितला.

त्याच्या मोबाईलवरून तिने फोन केला. फोन करून झाल्यानंतर तिने मोबाईल त्याला परत केला आणि त्याचे आभार मानण्यासाठी थॅंक्स म्हणत हात पुढे केला. मात्र त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि हाताचा किस घेतला. त्यानंतर तिला मिठीत ओढून तिच्या गालावरही किस केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. तेव्हा तो त्यात दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने हा प्रकार केल्याची कबूली दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like