FD पेक्षा जास्त ‘इथं’ मिळतंय व्याज, पैसे गुंतवण्यासाठी उरले फक्त 2 दिवस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे मात्र यासाठी तुमच्याकडे केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) मध्ये तुम्ही 22 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवू शकता. येथे 7 वर्षांच्या गुंतवणूकीवर वार्षिक 9.10 टक्के दराने व्याज दिले जाते. बँक एफडीच्या तुलनेत एनसीडीत जास्त व्याज आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली संधी आहे.

बँक एफडीपेक्षा 2% जास्त इंट्रेस्ट
गेल्या एका वर्षात देशातील सर्वोच्च सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी त्यांच्या डिपॉझिट रेटमध्ये सरासरी 50 बेसिस पॉईंटपर्यंत कपात केली आहे. 2015 नंतर हे 250 हून अधिक बेसिस पॉईंटने कमी झाले आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांच्या एफडीमध्ये गुंतवणूक वाढत आहे. जर कंपनीचे रेटिंग चांगले असेल तर त्यात गुंतवणूकीचा धोकाही कमी होतो. अशा परिस्थितीत श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचे नॉन कन्वर्टिबल डिबेंचर गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय असू शकतात.

जाणून घ्या कंपनीचे वेग वेगळे प्लॅन
श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्ष या कालावधीसाठी अनुक्रमे 8.85 %, 9 % आणि 9.1 % वार्षिक व्याज देत आहेत. यामध्ये सात वर्षांसाठी दिले जाणारे व्याज हे बँकेच्या एफडीच्या मानाने 210 बेसिस प्वॉइंट जास्त आहे. तसेच यामध्ये तीन आणि पाच वर्षांसाठी कम्युलेटिव पर्याय देखील आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या इश्युचा बेस साइज 200 कोटी रुपये आहे, 1000 कोटी रुपयांपर्यंत ओव्हरस्क्रिप्शनचा पर्यायही देखील देण्यात आलेला आहे.

क्रेडिट रेटिंग
CARE: AA+ /Stable
IND: AA+ /Stable
CARE: AA+ /Stable

किती करू शकता गुंतवणूक
NCD च्या एका बॉंडची फेस व्हॅल्यू 1000 रुपये आहे आणि कमीत कमी 10 बॉंडमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. म्हणजेच कमीत कमी दहा हजारांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. टाटा कॅपिटल हाऊसिंग मासिक आणि वार्षिक व्याज दराचा पर्याय देत आहेत. या एनसीडीची यादी शेअर बाजारात केली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा –