विश्वकप २०१९ : बांगलादेशविरुद्ध आज सराव सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वकप स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले असून सगळ्यांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु केली असून सराव सामने देखील खेळवले जात आहेत. त्यामुळे फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने पराभूत झालेला भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेपूर्वी मंगळवारी येथे बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या व अखेरच्या सराव सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करून मुख्य सामन्यापूर्वी आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेल.
पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने केलेल्या चकंदर कामगिरीने भारतीय संघ १८० धावाच करू शकला होता. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजी देखील हवी तितकी प्रमाणात उत्तम झाली नाही. त्यामुळे आज बांगलादेशविरुद्ध सर्वच स्तरावर चांगला खेळ करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील. भारताला ओव्हलमध्ये पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.

चौथ्या क्रमांकाची चिंता

पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आलेला के. एल. राहुल चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची चिंता अजूनही भारताला सतावत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे महत्वाचे आहे.

गोलंदाजी भिस्त

भारतीय संघात सध्या फक्त जसप्रीत न बुमरा फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे गोलंदाजी देखील संघासाठी मोठी चिंता आहे. मात्र भारतीय गोलंदाज एका सामन्यात पुनरागमन करू शकतात, त्यामुळे त्याची जास्त काळजी करण्याची गरज आहे.
दरम्यान, भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जून रोजी आपला पहिला सामना खेळेल.