आज ITR भरण्याची शेवटची तारीख, नंतर रिटर्न फाईल केल्यास 5000 रुपयांचा दंड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने ITR म्हणजे आयकर भरण्याच्या अंतिम तारखेत कोणतेही बदल केलेले नाहीत. ITR भरण्याची अंतिम तारीख आजच म्हणजे 31 ऑगस्ट (शनिवार) असणार आहे. सध्या सोशल मिडियावर अनेक फेक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. सरकारने ITR भरण्याची अंतिम तारीख वाढवून 30 सप्टेंबर केली असल्याचा एक मेसेज फिरत आहे तो पूर्णता: खोटे आहे. आयकर विभागाने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या सूचनेत म्हणले आहे, की ITR भरण्यासाठी 31 ऑगस्ट हीच शेवटची तारीख आहे.

याआधीच केली होती मुदतीत वाढ –

आयकर भरणाऱ्यासाठी या पूर्वीच मुदत वाढवून दिली होती, यापुर्वी अंतिम तारीख 31 जुलै होती, यानंतर आयकर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ITR ऑनलाइन भरता येतो.

31 ऑगस्टनंतर लागणार 5,000 रुपये दंड –

31 ऑगस्टनंतर ITR भरल्यास तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हा दंड 31 डिसेंबर पर्यंत ITR भरणाऱ्यासाठी असेल. 31 डिसेंबर नंतर ITR दाखल करणाऱ्यासाठी दंड जवळपास दुप्पट आकारण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –