राज्यात ‘या’ पॅटर्नव्दारे बनणार ‘महाशिवआघाडी’चं सरकार, जाणून घ्या ‘फॉर्म्युला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरुन तिढा निर्माण झाला आहे. परंतू एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या मार्गावर आहे. ही महाशिवआघाडी सत्तास्थापन करते का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. याआधी पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेत मागील पावणे तीन वर्षांपूर्व ही समीकरणं जुळली होती. हे तिन्ही पक्ष एकत्र अधिकृतरित्या महाशिवआघाडीच्या माध्यमातून सत्तेत एकत्र काम करत आहेत. हाच ‘दौंड पॅटर्न’ राज्यात राबवला जाणार का अशी चर्चा आहे. जसे त्यावेळी दौंड नगरपालिकेत घडले होते तसेच राज्यात राजकीय घडमोडीत देखील घडत आहे. वेगवेगळे विचारप्रणाली असलेले ही पक्ष एका नगरपालिकेत सशक्तपणे सत्तेवर स्थिर आहेत. त्यामुळे असे असेल तर राज्यस्तरावर देखील महाशिवआघाडीला यश मिळू शकते अशी चर्चा आहे.

पवारांच्या बालेकिल्ल्यापासून म्हणजेच बारामतीपासून 40 किलोमीटरच्या अंतरावर असलेले दौंड नगरपालिकेच्या जनतेतून थेट निवडून घ्यायच्या नगराध्यक्षपदासाठी आणि 12 प्रभागातील 24 जागांसाठी डिसेंबर 2016 मध्ये मतदान पार पडलं. पीडीसीसीचे अध्यक्ष आमदार रमेश थोरात यांनी निवडणूकीत राष्ट्रवादी – शिवसेना आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. या निवडणूकीत आघाडी असली तरी उमेदवारांनी आपापल्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी – शिवसेना आघाडी, राष्ट्रीय समाज पक्षाचे तत्कालीन आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाचे स्वतंत्र पॅनेल यांच्यात थेट सरळ लढत होती. यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळाच्या शीतल योगेश कटारिया यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार मिनाक्षी नंदकुमार पवार यांचा अवघ्या 120 मतांनी पराभव केला होता.

सध्या नगरपालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पिपल्स रिपब्लिकन पार्टी विकास आघाडी, बहुजन रयत परिषद या नोंदणीकृत गटाचे निवडूण आलेले 14 आणि स्वीकृत 2 असे एकूण 16 सदस्य आहेत. तर 10 सदस्य नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे आहेत आणि 1 स्वीकृत सदस्य असे एकूण मिळून 11 सदस्य आहेत.

यात आघाडीच्या एकूण निवडणूक आलेल्या 14 सदस्यापैकी 12 राष्ट्रवादीचे, 2 शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला येथे फक्त 2 सदस्य असले तरी एक वर्ष उपनगराध्यक्ष पद आणि विषय समित्यांचे सभापतिपदे मिळाल्याने शिवसेनेचा वाटा तसा मोठा राहिला.

दौंड नगरपालिकेत ठरल्याप्रमाणे राज्यात देखील ठरेल ?
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाशिवआघाडी होण्याची शक्यता आहे. परंतू प्रत्यक्षात त्याला वेळ आहे. मात्र दौंडमध्ये मागील पावणे तीन वर्षापासून एकत्र आहेत. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे की राज्यात देखील महाशिवआघाडी होऊ शकते.