‘फ्री’मध्ये LPG सिलेंडर मिळवण्याची शेवटची संधी ! जाणून घ्या, कोण आणि कसा घेऊ शकतं ‘या’ सरकारी ‘स्कीम’चा फायदा

 नवी दिल्ली : वृत्त संस्था  – कोरोना व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी 1.7 लाख करोड रूपयांचे मदत पॅकेज जाहीर केले होते. याच मदत पॅकेजचा भाग असलेल्या उज्ज्वला स्कीम अंतर्गत केंद्र सरकार मोफत एलपीजी सिलेंडर सप्लाय करणार आहे. सरकारच्या स्कीमचा लाभ केवळ तेच लोक घेऊ शकतात जे या स्कीमअंतर्गत रजिस्टर्ड आहेत. सरकारच्या या स्कीमचा फायदा घेण्यासाठी आता तुमच्याकडे केवळ एक महिना बाकी आहे. कारण 3 महीन्यापर्यंत फ्री गॅस सिलिंडर मिळवण्याचा कालावधी जून महिन्याच्या शेवटी संपणार आहे.

लाभार्थीचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य

लाभ घेण्यासाठी एलपीजी सिलेंडर ग्राहकांचा मोबाईल नंबर रजिस्टर असणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्याचा मोबाईल नंतर रजिस्टर असेल त्यालाच याचा लाभ मिळेल. स्कीम अंतर्गत लाभ देण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केल्यानंतर सिलेंडर सप्लाय सुद्ध सुरू केला आहे. यासाठी प्रथम लाभार्थीच्या खात्यात सिलेंडरची रक्कम जमा होईल. यांनतर तो गॅस बुक करेल आणि रोख पैसे भरून सिलेंडर घेईल.

एका महिन्यात किती सिलेंडर मिळणार

उज्ज्वला स्कीम अंतर्गत 14.2 किलोग्रॅमचे 3 सिलेंडरच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत दिले जातील. 1 महिन्यात एकच सिलेंडर मोफत दिला जाईल. ज्या लोकांजवळ 5 किलो वाले सिलेंडर आहेत, त्याना 3 महीन्यात एकुण 8 सिलेंडर दिले जातील. म्हणजे एक महीन्यात कमाल 3 सिलेंडर फ्री मिळतील.

कसा कराल अर्ज?

पीएमयूवाय अंतर्गत गॅस कनेक्शन घेण्यासाठी बीपीएल कुटुंबातील कोणतीही महिला अर्ज करू शकते. यासाठी तुम्हाला केवायसी फॉर्म भरून जवळच्या एलपीजी केंद्रात जमा करायचा आहे. अर्जासाठी 2 पेजचा फॉर्म, जरूरी कागदपत्र, नाव, पता, जन धन बँक अकाऊंट नंबर, आधार नंबर आदिची गरज आहे. अर्ज करताना हे सुद्धा सांगावे लागेल की, 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर घ्यायचा आहे की, 5 किलोग्रॅमचा. अर्ज तुम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. तुम्ही जवळच्या एलपीजी केंद्रातूनही फॉर्म घेऊ शकता.

पीएमयूवायसाठी कोणते कागदपत्र जरूरी?

1 पंचायत अधिकारी किंवा नगर पालिकाद्वारे अधिकृत बीपीएल कार्ड
2 बीपीएल रेशन कार्ड
3 फोटो आयडी (आधार कार्ड, वोटर आयडी)
4 पासपोर्ट साईज फोटो
5 रेशन कार्डची कॉपी
6 राजपत्रित अधिकार्‍याकडून (गॅझेटेड अधिकारी) सत्यापित स्व-घोषणा पत्र
7 एलआयसी पॉलिसी, बँक स्टेटमेंट
8 बीपीएल यादीतील नावाची प्रिंट आऊट