अखेर तिसऱ्या दिवशी ‘त्याचा’ मृतदेह नदीपात्रात तरंगताना सापडला

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात विटा बुद्रुक येथील चालकाने गावालगतच्या नदीपात्र वरील पुलावरून उडी घेत आपला जीवन प्रवास संपला. ही घटना 16 ऑगस्ट रोजी विटा बुद्रुक येथे घडली. घटनेची माहिती मिळाल्यावरून प्रशासनाकडून तुकाराम तूपसमुद्रे अंदाजे वय 36 यांचा गोदावरी नदी पात्रात शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. नदीपात्र दुथडी भरले असल्याने तुकाराम तूपसमुद्रे हे अग्निशामक दलाच्या शोध घेणाऱ्या जवानांना सापडले नाही. घटना घडून तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह तरंगत असलेल्या अवस्थेत गोदापात्रात दिसून आला.

( 18 ) ऑगस्ट रोजी मृत तुकाराम तूपसमिंद्रे यांना बाहेर काढले. नदीपात्रातील पाण्याच्या बाहेर काढून त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. बाभळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमुख डॉक्टर पळशीकर यांनी शवविच्छेदन केले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली. यावेळी बीट जमादार गणेश फड, तलाठी मिलिंद विटेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर पळशीकर विटा बुद्रुक येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे बाभळगाव येथील आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. पळशीकर यांनी सांगितले. विटा बुद्रुक येथील चालक तुकाराम तूपसमिंद्रे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे असे कळते. त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.