अखेर राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम असतानाच राष्ट्रवादीने आमच्याकडे बहुमताचे आकडे नाहीत असे सांगितल्यानंतर अखेर राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस करण्यात आली आहे. याबाबत केंद्रात देखील एक बैठक झाली. कोणत्याही क्षणी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते त्यामुळे राज्यात आता कोणाचीही सत्ता नाही हे जवळ जवळ निश्चित झालेले आहे.

सत्ता स्थापनेचा तिढा सुटलाच नाही
शिवसेनेकडून काल सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचालींना सुरुवात झाली होती. त्यावेळी सेना सत्ता स्थापन करणार असेच सगळ्यांना वाटत होते मात्र काँग्रेसने ऐन वेळी संमत्ती पत्र न दिल्याने सेनेला सत्ता स्थापनेपासून वंचित रहावे लागले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याचे स्पष्ट केले.

तत्पूर्वी जास्त संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाजपने शिवसेनेने आपल्याला साथ न दिल्याने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like