Lata Deenanath Mangeshkar Award | पीएम मोदी, सीएम उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Deenanath Mangeshkar Award | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackerya) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे उद्या मुंबईमध्ये (Mumbai) एकाच मंचावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या (Master Dinanath Mangeshkar Smriti Pratishthan) पहिला लता मंगेशकर पुरस्काराचा (Lata Deenanath Mangeshkar Award) कार्यक्रम मुंबईत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला हे तिन्ही नेते उपस्थित असणार असल्याची माहिती समजत आहे.

 

पंतप्रधान मोदी यांना पहिला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar) यांचा उद्या स्मृतीदिन आहे. याचनिमित्त दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, पुणे या सार्वजनिक ट्रस्टतर्फे पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कारही केला जातो. हा कार्यक्रम श्री षण्मुखानंद हॉल (Sri Shanmukhananda Hall) येथे पार पडणार आहे.

राज्यातील स्थिती पाहता भाजप (BJP) हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधत आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा विषय हाती घेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील राजकीय स्थिती पाहता तिन्ही नेते एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे (Loudspeakers On Masjid)
उतरवण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा आणि राज्य सरकारला दिलेला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम.
आज नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि रवी राणा (MLA Ravi Rana)
यांनी पंतप्रधानांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

 

Web Title :- Lata Deenanath Mangeshkar Award | pm narendra modi cm uddhav thackeray mns chief raj thackeray may be share stage in first lata deenanath mangeshkar award

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा