ICC World Cup 2019 : कॅप्टन कुलच्या ‘रिटायरमेंट’वर लता मंगेशकर म्हणाल्या, देशाला तुमच्या खेळाची आवश्यकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड कप २०१९ मध्ये नंतर महेंद्र सिंग धोनीच्या रिटायरमेंटची चर्चा सुरु झाली आहे. आता चर्चा यांची आहे की धोनी वन-डे आणि टी-२० क्रिेकेटमधून संन्यास घेणार आहे. तर चाहते सोशल मिडियातून धोनीला आवाहन करत आहेत की धोनीने रिटायरमेंट घेऊ नये. या दरम्यान गायिका लता मंगेशकर ने देखील धोनीला असेच आवाहन केले आहे की त्यांने रिटायरमेंट घेऊ नये.

लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे की, नमस्कार एम. एस. धोनी. सध्या ऐकायला येत आहे की तुम्ही रिटायर होऊ इच्छित आहेत. कृपया तुम्ही असे करु नका. देशाला तुमच्या खेळाची आवश्यकता आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की रिटायरमेंटचा विचार तुम्ही मनातून काढून टाका. तर लता मंगेशकर अशा एकट्याच नाहीयेत की त्यांनी धोनीला हे आवाहन केले आहे.

याआधी सचिन तेंडूलकरने सांगितले होते की, तो त्यांच्या व्यक्तिगत निर्णय आहे आणि याच निर्णयाचा विचार करायला धोनीला एकट्याला सोडले पाहिजे. कारण तो त्यांच्या व्यक्तीगत निर्णय आहे. सर्वांना, त्याला त्यांचा वेळ देण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा सन्मान केला पाहिजे. अशा अफवा पसरवण्यापेक्षा भारतीय क्रिकेटमधील धोनीचा आणि त्याच्या योगदानाचा सन्मान केला पाहिजे.

बीसीसीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती वरुन सांगण्यात आले होते की, धोनी या वर्ल्डकप नंतर क्रिकेट मधून संन्यास घेणार आहे. तर धोनीने प्रतिक्रिया देताना सांगितले की, लोकांना वाटते की मी आताच संन्यास घेतला पाहिजे. तर मॅच नंतर विराटला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, मला धोनीने तो पुढे क्रिकेट खेळणार नसल्या बद्दलचे काहीही सांगितले नाही.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या