रक्षाबंधना दिवशी लता मंगेशकर यांनी PM मोदींकडे मागितलं देशाला आणखी उंचावर घेवुन जाण्याचं ‘वचन’, पंतप्रधानांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील दिग्गज गायिक लता मंगेशकर यांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. लता मंगेशकर यांनी व्हिडीओदेखील शेअर केला होता. यावर्षी पीएम मोदींना त्या राखी का पाठवू शकल्या नाहीत हेही त्यांनी सांगितलं होतं. सोबत त्यांनी मोदींकडून एक वचनही मागितलं होतं.

व्हिडीओ शेअर करताना लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, “आज मी तुम्हाला राखीच्या शुभ मुहूर्तावर प्रणाम करते. आज मी राखी का नाही पाठवू शकले हे याचं कारण जगालाही माहित आहे. तुम्ही देशासाठी खूप काही केलं आहे. आज देशातील लाखो महिलांचे हात राखी बांधण्यासाठी पुढं येत आहेत. परंतु राखी बांधणं मुश्किल आहे. तुम्ही हे समजू शकता. आज राखीच्या दिवशी मला हे वचन द्या की, तुम्ही भारताला आणखी उंचीवर न्याल.”

लता मंगेशकर यांच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी उत्तरही दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, “रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर लता दीदी, तुमचा हा भावपूर्ण संदेश अपार प्रेरणा आणि ऊर्जा देत आहे. कोट्यावधी माता-भगिनींच्या आशीर्वादानं आपला देश नवीन उंची गाठेल आणि नवं यश मिळवेल. तुम्ही निरोगी आणि दीर्घायुषी रहावं ही देवाकडे प्रार्थना आहे.”