ताज्या बातम्यामुंबई

Lata Mangeshkar | गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन; जाणून घ्या कोणी दिली मुखाग्नी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज (रविवार) सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. त्या 92 वर्षाच्या होत्या. शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे देशावर शोककळा पसरली. लतादीदींवर (Lata Mangeshkar) दादर येथील शिवाजी पार्कवर (Shivaji Park Dadar) संपूर्ण शासकीय इतमामात सायंकाळी 7 वाजून 20 मिनीटांनी अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहून मंगेशकर कुटुंबियांचे (Mangeshkar Family) सांत्वन केले.

 

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), राष्ट्रावादीचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, विरोधी पक्षातील नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लता मंगेशकर यांना त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांनी मुखाग्नी दिला. (Lata Mangeshkar)

आज सकाळी लता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीच कँडी हॉस्पटीलमधून त्यांच्या प्रभूकुंज (Prabhukunj) येथील घरी नेण्यात आला.
त्यानंतर लष्कराच्या फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे आणण्यात आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याचपद्धतीने लतादीदींनाही (Latadidi) अखेरचा निरोप देण्यात आला.
एवढेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या गुरुजींनी सतीश घाडगे (Satish Ghadge) यांनी अंत्यसंस्कार केले
त्यांनी लतादीदींवरही अंत्यसंस्कार केले. त्यांच्यासह एकूण 8 ‘गुरुजीं’नी भगवद्गीतेमधील (Bhagavad Gita) 14 वा अध्यायाचे पठण केले.

 

दरम्यान, शिवाजी पार्कवर होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या संपूर्ण तयारीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: लक्ष ठेवून होते.
त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे आयुक्त, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत सहभाग घेतला.

 

Web Title :-  Lata Mangeshkar | Bharat Ratna Lata Mangeshkar merged into Infinity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Penny Stock | पुण्यातील ‘या’ कंपनीचा 14 रुपयांचा स्टॉक देतोय बंपर रिटर्न! गुंतवणुकदारांचे 1 लाख केले रू. 18 लाख, तुमच्याकडे आहे का?

 

Fatty Liver Home Remedies | फॅटी लिव्हरने असाल त्रस्त तर दररोज करा ‘ही’ 4 योगासन, आहारात करा ‘हे’ 5 बदल; जाणून घ्या

 

Mira Road Crime | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच केली 2 वर्षाच्या मुलीचा निर्घृण खून

Back to top button