Lata Mangeshkar Death News | लतादीदींना श्रध्दांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत येणार – मीडिया रिपोर्ट्स
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lata Mangeshkar Death News | भारताच्या स्वर कोकीळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन (Lata Mangeshkar Death News) झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. मागील काही दिवसांपासून लतादीदी यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लवकर ब-या व्हाव्या यासाठी डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी माहिती दिली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. लता मंगेशकर यांच्यावर आज संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, लतादीदींना श्रध्दांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईत येणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आलीय.
लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
I am anguished beyond words. The kind and caring Lata Didi has left us. She leaves a void in our nation that cannot be filled. The coming generations will remember her as a stalwart of Indian culture, whose melodious voice had an unparalleled ability to mesmerise people. pic.twitter.com/MTQ6TK1mSO
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ”मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. तिने आपल्या देशात एक पोकळी सोडली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या तिला भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.”
Web Title :- Lata Mangeshkar Death News | lata mangeshkar death news pm modi may be visit mumbai media reports
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update