‘सोशल मिडिया’वर लता मंगेशकरांच्या निधनाची ‘अफवा’, लोक देत आहेत ‘श्रध्दांजली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून गानकोकिळा लता मंगेशकर या तब्येत ठीक नसल्या कारणाने रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. लता मंगेशकर यांची तब्येत नाजूक असली तरी आता सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मिडियावर एकीकडे लता मंगेशकर याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे तर दुसरीकडे त्यांच्या निधनाच्या अफवा पसरत आहेत.

ट्विटर -फेसबूक आणि व्हाट्सअॅपवर अनेक मेसेज फॉरवर्ड करण्यात येत आहे ज्यात लता मंगेशकर यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. परंतू लता मंगेशकर यांच्या निधनाच्या या सर्व अफवा असल्याचे सांगण्यात येत आहे. लता मंगेशकर सध्या रुग्णालयात दाखल आहेत. शनिवारी लता मंगेशकर यांच्या मिडिया गटाने सांगितले की लता मंगेशकर यांची तब्येत आता पहिल्या पेक्षा उत्तम आहे आणि तब्येतीत सुधार येत आहे.

90 वर्षीय लता मंगेशकर मागील सोमवारपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना श्वास घेण्यास समस्या येत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात विशेष डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या सोशल मिडियावर खोट्या पोस्ट, मेसेज व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे अखेर लता मंगेशकर यांच्या मिडिया गटाकडून सांगण्यात आले की या प्रकारच्या अफवा पसरवण्यात येऊ नयेत. यासंबंधित ट्विट लता मंगेशकर यांच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की लता मंगेशकर यांची तब्येत आता सुधारत आहे.

लता मंगेशकर यांचे उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी सांगितले होते की लताजी सध्या निमोनिया, ऱ्हदयाची समस्या आणि छातीतील दुखण्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्हाला आशा आहे की त्या लवकरच बऱ्या होतील.

Visit : Policenama.com