Lata Mangeshkar | PM मोदींनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी – जगद्गुरु परमहंस आचार्य

अयोध्या : वृत्तसंस्था – Lata Mangeshkar | मागील काही दिवसांपासून भारतरत्न (Bharat Ratna) गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये (Breach Candy Hospital Mumbai) उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांना कोरोना (Corona) आणि न्युमोनियाची लागण (Pneumonia Infection) झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रर्थना केली जात आहे. दरम्यान अयोध्येमध्ये देखील लता मंगेशकर यांच्यासाठी महायज्ञ तपस्वी लावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य (Jagadguru Paramahansa Acharya) यांच्या नेतृत्वाखाली महामृत्युंजय मंत्राचा (Mahamrityunjaya Mantra) जप करण्यात आला. यानंतर प्रतिक्रिया देताना जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी पंतप्रधानांना एक विनंती केली आहे.

 

 

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज म्हणाले, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला असल्याचे सांगितले. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची भेट घ्यावी अशी विनंती सुद्धा जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी मोदींना केली आहे.

 

 

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी (Dr Pratit Samdani) यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार,
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
मात्र, तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
त्या लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा, असंही डॉ. समदानी यांनी म्हटले होते.

 

Web Title :- Lata Mangeshkar | hawan performed for the recovery of lata mangeshkar in ayodhya Jagadguru Paramahansa Acharya said PM Narendra Modi should meet Lata Mangeshkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corruption Perceptions Index (CPI) | भारतात किती आहे भ्रष्टाचार ? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केला पाकिस्तानसह अनेक देशांचा डेटा

 

Ajit Pawar | अजित पवार अ‍ॅक्टीव्ह नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा?, दादा म्हणाले – ‘काही गोष्टी दाखवायच्या नसतात…’ (व्हिडीओ)

 

Bank FD Saving Schemes | जर तुम्ही सुद्धा एखाद्या बँकेत काढली असेल FD तर वाचा ही महत्वाची बातमी, होईल फायदा