Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली; कोणालाही भेटण्याची परवानगी नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | देशातील स्वर कोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) यांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोनाची (Corona) लागण तसेच न्यूमोनियाही झाला होता. परंतु तेवढे लक्षण सौम्य होते म्हणून डाॅक्टरांनी सांगितलं होतं. दरम्यान आता त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर लता मंगेशकर यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नाही असं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

 

लतादीदींना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाही झाला आहे. त्यामुळं त्यांची प्रकृती सध्या खालावली आहे. उपचांराना प्रतिसाद दिल्यास हळूहळू सुधारणा होईल, किती दिवस लागतील हे सांगणंही कठिण असल्याचंही उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करा, असं देखील आवाहनही डॉक्टरांनी काल केलं होतं. अशी माहिती डॉ. प्रतीक समधानी (Dr. Prateek Samadhani) यांनी दिली होती.

 

दरम्यान, नुकत्याच आता आलेल्या माहितीनुसार लता (दिदी) मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) यांची तब्येत खालावली असून अनेक चाहत्यांनी मंगेशकर यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त केलीय.

 

Web Title : Lata Mangeshkar Health Update | Health condition of indias singing icon lata mangeshkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा