Lata Mangeshkar Health Update | गानकोकिळा लता दिदींच्या अधिकृत ट्विटरवरुन देण्यात आलं हेल्थ अपडेट; सर्वांना केली ‘ही’ कळकळीची विनंती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना गेल्या काही दिवसांपुर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून जगभरातील लाखो चाहते लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. स्वरकोकिळा लवकर बरी होवो हीच प्रार्थना भारतीवासीय करीत आहेत. प्रकृतीबाबत आज (शनिवारी) पुन्हा लता दिदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आलीय. तसेच, सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना कळकळीची विनंती देखील करण्यात आली आहे. (Lata Mangeshkar Health Update)

 

आज (शनिवारी) सायंकाळी 6.15 वाजता लता मंगेशकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे की, कृपया, त्रासदायक अफवा थांबवाव्यात ही कळकळीची विनंती. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील (Breach Candy Hospital, Mumbai) डॉ. प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) यांच्याकडून लतादीदींच्या प्रकृती विषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे. दिदींच्या प्रकृतीत सकारात्मक सुधार दिसून येत असून, सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दिदी लवकर बर्‍या व्हाव्यात म्हणून आणि घरी परताव्यात म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी, असं ट्विट लतादिदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

दरम्यान, एएनआयने आज (शनिवारी) दुपारी 12.30 वाजता ट्विट केलं होतं की.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये किंचीत सुधारणा आहे.
त्या आयसीयूमध्ये (ICU) आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतुत समदानी (Dr. Pratut Samdani) यांनी ही माहिती दिली होती.

 

Web Title :-Lata Mangeshkar Health Update | Health update from singer Lata Didi s official Twitter A heartfelt request to all

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा