×
HomeमनोरंजनLata Mangeshkar Health Update | गानसम्राज्ञी लता मंगेशकर 'कोरोना'मुक्त - आरोग्यमंत्री राजेश...

Lata Mangeshkar Health Update | गानसम्राज्ञी लता मंगेशकर ‘कोरोना’मुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | मागील काही दिवसांपासून गानसम्राज्ञी भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर या लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी सर्वजण प्रार्थना (Prayer) करत आहेत. लतादीदींच्या प्रकृतीसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहीती दिली आहे. (Lata Mangeshkar Health Update)

 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लतादीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. त्या गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर (Ventilator) होत्या. परंतु आता त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे. न्यूमोनिया (Pneumonia) आणि कोरोनातून (Corona) लतादीदी (Latadidi) आता बऱ्या झाल्या आहेत. सध्या ब्रेन इन्फेक्शनमध्ये (Brain Infection) सुधारणा करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. परंतु आता त्या थोडं बोलूही शकतात. डॉक्टरांना त्या प्रतिसादही देत आहेत. काही प्रमाणात त्यांना अशक्तपणा असून त्यावर उपचार सुरु असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

 

दरम्यान, शनिवारी लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. लतादीदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी महत्त्वाची माहिती दिली होती.

 

Web Title :- Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar cured from corona said maharashtra health minister rajesh tope

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

Must Read
Related News