Lata Mangeshkar Health Update | ‘या’ कारणामुळं दोन दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | मागील अनेक दिवसांपासून स्वरकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) रूग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्या मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital, Mumbai) आहेत. अनेक दिवसांपासून चाहत्यांकडून चिंता व्यक्त होतेय. लतादीदी लवकर बऱ्या होऊन घरी परत याव्या, यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

”लतादीदी व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र 2 दिवसांपूर्वीच त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट (Ventilator Support) काढून टाकण्यात आला आहे. त्यांच्या तब्येतीत सुधार होत असल्यामुळे व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला आहे. डॉक्टरांनी पुढे असं देखील सांगितलं की, तरीही पुढील काही दिवस लतादीदी आयसीयूमध्ये राहतील आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असतील. त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधार दिसून येत आहे. ही बाब चाहत्यांसाठी दिलासादायक आहे.” असं डॉक्टरांनी सांगितलं. (Lata Mangeshkar Health Update)

 

दरम्यान, ‘लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत सातत्याने चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. सोशल मीडियावर रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. मात्र व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊ नका. त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या बातम्या पसरवणे बंद करा, असं वेळोवेळी मंगेशकर कुंटूंबीयाकडून सांगण्यात आलं होतं.

 

Web Title :- Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar health 2 days ago lata didis ventilator support was removed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा