Lata Mangeshkar Health Update | गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या प्रकृतीबाबत मोठी हेल्थ अपडेट; पुन्हा प्रार्थनेची विनंती…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | मागील अनेक दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे. दरम्यान आता लतादीदींच्या प्रकृतीबाबत नवीन माहिती समोर आली आहे. लतादिदींची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असं त्यांच्या टीमने सांगितलं आहे. (Lata Mangeshkar Health Update)

 

‘लता दीदींची (Lata Didi Health Updates) प्रकृती स्थिर आहे. सध्या त्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांना लवकर बरं करण्यासाठी आमची टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. तुमच्याही प्रार्थनेची गरज आहे.’ अशी माहिती मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचे (Breach Candy Hospital, Mumbai) डॉक्टर प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी दिली आहे.

 

दरम्यान, ‘लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत सातत्याने चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. सोशल मीडियावर रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. मात्र व्हायरल मेसेजवर कसलाही विश्वास ठेऊ नका. त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. खोट्या बातम्या पसरवणे बंद करा, असं लतादीदींच्या ट्विटरवरुन एक-दोन दिवसापुर्वी सांगण्यात आलं होतं. दरम्यान, ”त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. आणि डॉक्टर त्यांच्या संपूर्ण टीमसह त्यांच्यावर उपचार करत आहेत. आम्ही लता दीदींना रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याची वाट पाहत आहोत, प्रार्थना करा” असं मंगेशकर कुंटूबीयांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar health update showing positive signs of improvement need to pray for her speedy recovery

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा