Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले – ‘दिदींची प्रकृती स्थिर पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | गेल्या अनेक दिवसांपासून भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) रूग्णालयात अँडमिट आहेत. कोरोनाच्या कारणास्तव त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital, Mumbai) उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीबाबत अनेक वेगवेगळे अपडेट येत आहे. लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परत याव्या, अशी प्रार्थना जगभरातून केली जात आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ”लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये (Lata Mangeshkar Health Update) थोड्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अशी माहिती डॉ. प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी दिली आहे.

 

मंगळवार (25 जानेवारी) रोजी सांयकाळी 5.19 वाजता एएनआय ट्विटच्या माहितीनूसार, डॉ. प्रतित समदानी म्हणाले, ”लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये थोड्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.” अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ‘लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत सातत्याने चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे.
सोशल मीडियावर रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत.
मात्र व्हायरल मेसेजवर कसलाही विश्वास ठेऊ नका. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
खोट्या बातम्या पसरवणे बंद करा, असं लतादीदींच्या ट्विटरवरुन एक-दोन दिवसापुर्वी सांगण्यात आलं होतं.
तसेच आम्ही लता दीदींना रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याची वाट पाहत आहोत, प्रार्थना करा” असं लता मंगेशकर कुंटूबीयांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar health update there is a marginal improvement in lata didis health and she continues to be in the icu dr pratit samdani

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा