Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lata Mangeshkar Health Update | भारताच्या स्वर कोकीळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) मागील अनेक दिवसांपासून उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. लतादीदी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. आज पुन्हा एकदा लतादिदींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Lata Mangeshkar Health Update)

 

 

8 जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांचे चाहते लतादीदी लवकर बर्‍या व्हाव्यात यासाठी सर्वत्र प्रार्थना करत आहेत. आज (शनिवारी) एएनआयने दिलेल्या माहितीनूसार, लतादीदींची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवून आहे. अशी माहिती डॉ. प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी दिली. (Lata Mangeshkar Health Update)

 

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, ‘लोकांमध्ये खोट्या बातम्यांचा प्रसार त्रासदायक आहे. कृपया लक्षात घ्या की लता दीदी त्याच्या घरी लवकर परतण्यासाठी प्रार्थना करा. असं सांगण्यात आलं होतं.

 

 

Web Title :-  Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar is critical She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

 

Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | 5 हजाराचा हप्ता घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील 600 पेक्षा जास्त कर्मचारी केले जाणार कमी