Lata Mangeshkar | 2 वर्षापासून गाठीभेटी टाळल्या, घराच्या बाहेरही पडल्या नाहीत, मग लतादीदींना कोरोनानं कसं गाठलं? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गानसम्राज्ञी भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज सकाळी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीला रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तरीही न्यूमोनियामुळे (Pneumonia) त्यांची प्रकृती गंभीर होती. अशात 6 फेब्रुवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला (Lata Mangeshkar Passes Away). कोरोना काळात लतादीदी (Latadidi) दोन वर्षे कोणाचीही गाठीभेटी घेत नव्हत्या आणि त्या घरातच होत्या. तरीही त्यांना कोरोनाने कस घेरलं असा प्रश्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या चाहत्यांना पडला आहे.

 

लता मंगेशकर याचं वय जास्त असल्याने त्या मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रसारामुळे लोकांना भेटणं टाळत होत्या. कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली. मात्र त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं निमित्त ठरलं घरातल्या एका मतदनीसाला कोरोनाची लागण. कोरोनाच्या दोन्ही लाटेत लता मंगेशकर कुटुंबीयांना (Mangeshkar Family) त्रास झाला नाही. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत कोरोनाच्या (Mumbai Corona) नव्या लाटेने अक्षरशा थैमान घातलं होतं. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्याच वेळी लता मंगेशकर कुटुंबीयांच्या घरी काम करणाऱ्या स्टाफपैकी एकाची कोरोना टेस्ट सकारात्मक आली होती.

 

घरगुती गोष्टी खऱेदी करण्यासाठी घरातली नोकरमंडळी, मतदनीस, स्टाफ मेंबर्स बाहेर जात असतात. त्यापैकी एकीचा लता मंगेशकर यांच्याशी संपर्क आल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवसांत त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील 27 दिवसांपासून लतादीदींवर उपचार सुरु होते.

नोव्हेंबर 2019 पासून लता मंगेशकर घराबाहेर पडलेल्या नव्हत्या.
त्या घरीच आराम करत असत. त्या फार कुणाशी गाठीभेटी ही घेत नसत.
त्याच सुमारास त्यांना एकदा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यावेळी 28 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्या आजारपणातून लतादीदी सुखरुप घरी परतल्या. त्यानंतर जगभरात कोरोनाची साथ सुरु झाली आणि लतादीदींनी घरातच राहणं पसंत केलं.

 

Web Title :- Lata Mangeshkar | how lata mangeshkar get infected with corona lata mangeshkar passes away today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा