लता मंगेशकर तरुणीच्या गाण्याच्या प्रेमात, केला व्हिडिओ शेअर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाचे दिवाने फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र लता मंगेशकर एका तरुणीच्या आवाजाच्या प्रेमात पडल्या आहे.  मंगेशकर यांना या तरुणीचा आवाज इतका आवडला की त्या स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. त्यांनी स्वत: या तरुणीच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

लता मंगेशकर यांना कुणीतरी या तरुणीचा व्हिडीओ पाठवला होता. त्यांनी तरुणीचे गाणे ऐकून ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या तरुणीच्या सुरेल आवाजाचे त्यांनी कौतुक करीत तरुणीला आशीर्वाद दिले आहेत. लता मंगेशकर यांनी ट्वीट केले आहे की, नमस्कार, मला हा व्हिडीओ कुणीतरी पाठवला होता. ही तरुणी महान ऑस्ट्रियन संगीतकार मोझर्थ यांच्या भारतीय सरगममध्ये खूप सुंदररित्या गात आहे.

माझा या तरुणीला आशीर्वाद आहे, ही तरुणी खूप चांगली गायिका बनेल लतादीदींचा आशीर्वाद आपल्याला मिळावा असे स्वप्न प्रत्येक गायकाचे असते. हा आशीर्वाद तरुणीला मिळाल्यानंतर तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ही तरुणी पश्चिम बंगालची राहणारी आहे. समादीप्ता मुखर्जी असे तिचे नाव आहे.