Lata Mangeshkar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली; जुना फोटो शेअर करत PM म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Lata Mangeshkar | भारत रत्न लता मंगेशकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटरव्दारे श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, लतादिदी आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवू शकत नाही. लतादिदीच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे. जी कधीही भरली जाऊ शकत नाही़ येणार्‍या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील. ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. (Lata Mangeshkar Passes Away)

 

लता दिदी यांचा आवाजात वेगळेपणा होता. भारतीय चित्रपटातील बदलाच्या त्या जवळून साक्षीदार आहेत. चित्रपटसृष्टीबरोबरच त्या भारताच्या प्रगतीविषयी उत्कट होत्या. भारत देश हा मजबूत आणि विकसित व्हावा अशी त्यांची अपेक्षा असायची.

मी हा माझा सन्मान समजतो की मला लतादीदींकडून नेहमीच अपार स्रेह लाभला आहे. त्यांच्यासोबतचा माझा संवाद अविस्मरणीय राहिला आहे. लतादीदींच्या निधनाबद्दल मी माझ्या भारतीय सहकार्‍यांसोबत शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबियांशी बोलून शोक व्यक्त केला आहे. ओम शांती.

 

देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; सायंकाळी दादर येथे अंत्यसंस्कार
भारत रत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र शासनाने देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
लता मंगेशकर यांनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले.
जगाच्या कानाकोपर्‍यात सतत लता मंगेशकर यांनी गायलेले कोणते ना कोणते गाणे ऐकले जात असते. अशा लता मंगेशकर यांच्या निधनाने देश दु:खसागरात बुडाला आहे. दादर येथील स्मशान भूमीत आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले.

 

Web Title :- Lata Mangeshkar | Lata Didi Has Left Us She Leaves A Void PM Narendra Modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar Net Worth | लता मंगेशकर यांची संपत्ती किती? जाणून घ्या

 

Lata Mangeshkar Passes Away | गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांचे उपचारादरम्यान निधन