×
Homeताज्या बातम्याLata Mangeshkar | 'त्या' वेळी लतादीदींचा आवाज ऐकून पंडित नेहरुंनाही अश्रू अनावर...

Lata Mangeshkar | ‘त्या’ वेळी लतादीदींचा आवाज ऐकून पंडित नेहरुंनाही अश्रू अनावर झाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांच्या स्वरामध्ये प्रत्यक्ष सरस्वतीचा वास होता अशा गानसम्राज्ञी, भारताची गानकोकिळा भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 92 वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) अखेरचा श्वास (Lata Mangeshkar Passes Away) घेतला. त्यांच्या आवाजाने देशाच्या पंतप्रधानांनाही (PM) भुरळ पडली होती. ते गाणे ज्याने आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे येतात, ते अजारामर गीत म्हणजे, ‘ऐ मेरे वतन के लोगों’ (Aye Mere Watan ke Logo) आज याच गाण्याची (Song) एक गोष्ट आज जाणून घेऊयात.

 

तो काळ होता 1962 चा. चीनसोबत युद्धात (India-China War) भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे केवळ राजकारणीच (Politician) नाही तर संपूर्ण देशाचे मनोधैर्य खचले होते. देशाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांच्या नजरा चित्रपट विश्वावर आणि कवींवर खिळल्या होत्या. सरकारकडून चित्रपटसृष्टी देशाला नवसंजीवनी देईल असे काहीतरी करण्यास सांगितले होते. ‘हे मेरे वतन के लोगो’ हे गाणे लिहणारे कवी प्रदीप (Kavi Pradeep) यांनी अनेक देशभक्तीपर गीतांचे (Hindi Patriotic Songs ) लिखाण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडे हा प्रस्ताव आला होता.

 

असे रचले ‘हे’ गाणे
कवी प्रदीप यांनी सांगितले की, त्यावेळी बॉलिवूडमध्ये (Bollywood) तीन महान गायक होते, मोहम्मद रफी (Mohammad Rafi), मुकेश (Mukesh) आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar). याच दरम्यान मोहम्मद रफी यांनी ‘We can never our freedom हे गाणे गायले. राज कपूर (Raj Kapoor) यांनी मुकेशचे ‘जिस देश मे गंगा बहती है’ हे गाणे गायले होते. अशा परिस्थितीत लता मंगेशकर याच एकमेव गायिका राहिल्या होत्या. आपल्या मधुर आणि मखमली आवाजासाठी एक भावनिक गाणे लिहण्याचा विचार केला. ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ हे गाणे अशाप्रकारे तयार झाले.

‘ए मेरे वतन के लोगों…’ गाण्याबद्दल लतादीदींनी सांगितले…
लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत या गाण्याबाबत एक आठवण सांगितली होती. 1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) जेव्हा त्यांना ‘ए मेरे वतन के लोगों…’ या गाण्यासाठी ऑफर आली, तेव्हा त्यांनी आधी हे गाणे गाण्यास नकार दिला. त्यांच्याकडे गाण्याचा सराव करण्यासाठी वेळ नव्हता. या गाण्यामागची संपूर्ण कहाणी लतादीदींनी (Lata Didi) मुलाखतीत सांगितले. या गाण्याचे अजरामर बोल कवी प्रदीप यांनी लिहिले असल्याचे लतादीदींनी सांगितले.

 

कवी प्रदीप यांनी हे गाणे गाण्यास त्यांना विनंती केली होती. मात्र बीझी शेड्युलमुळे त्या गाण्यावर विशेष लक्ष देणं शक्य नव्हतं. कवी प्रदीप यांनी त्यांना गाण्यासाठी प्रवृत्त केल्यावर त्या आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यासोबत गाण्यास तयार झाल्या. परंतु ऐन कार्यक्रमापूर्वी आशा भोसले यांनी दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ या प्रकल्पाचे सूत्रसंचालन करणारे संगीतकार हेमंत कुमार (Music Composer Hemant Kumar) यांनी आशा दीदींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या तयार झाल्या नाहीत. अशा स्थितीत लता मंगेशकर यांनी एकट्याने गाण्याची तयारी करावी लागली, अशी आठवण लता मंगेशकर यांनी मुलाखतीत सांगितले होते.

 

कमी वेळेत गाण्याचा रियाज
‘ए मेरे वतन के लोगों…’ हे गाणे रचणारे सी रामचंद्र हेही चार-पाच दिवसांपूर्वी दिल्लीत आले होते. अशा स्थितीत लता मंगेशकर यांना रियाझची साथ मिळाली नाही. रामचंद्र यांनी त्यांना गाण्याची टेप दिली होती, ती ऐकूनच लतादीदींना गाण्याचा रियाज करावा लागला. कार्यक्रमासाठी विमानाने दिल्लीला जाताना लतादीदींनी रामचंद्र यांनी दिलेल्या टेप्स ऐकत राहिल्या. परंतु दिल्लीत पोहचताच गाण्याच्या काळजीने त्यांच्या पोटात दुखू लागले. मात्र 27 जानेवारी 1963 रोजी नवी दिल्ली येथील नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium Delhi) त्या पोहचल्या आणि ‘ऐ मेरे वतन के लोगो..’ गाणे गायले.

पंडीत नेहरुंचे डोळे पाणवले
लतादीदींनी सांगितले की, गाणे संपवून जेव्हा त्या स्टेजवरून निघाल्या तेव्हा मेहबूब खान (Mehboob Khan) आले आणि हात धरुन म्हणाले,
‘चलो नेहरू जी ने बुलाया है’. पंडितजींना (Pandit Nehru) त्यांना का भेटायचे आहे, असा प्रश्न त्यांना पडला होता.
लताजी स्टेजवर आल्यावर पंडितजींसह सर्वांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. पंडितजींनी गाण्याची स्तुती केली, त्यावेळी डोळेही पाणावले होते.

 

लतादीदींना हे गाणं प्रसिद्ध होईल असा विश्वास नव्हता
लताजींच्या म्हणण्यानुसार, हे गाणं इतकं लोकप्रिय होईल यावर त्यांना अजिबात विश्वास नव्हता.
‘ऐ मेरे वतन के लोगो…’ हे गाणं देशाला इतकं आवडलं की प्रत्येक कार्यक्रमात त्यांना हे गाणं गाण्याची विनंती करण्यात आली.

 

Web Title :- Lata Mangeshkar | lata mangeshkar ae mere watan ke logon moved former prime minister jawaharlal nehru to tears

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Stock | 29 रुपयांच्या ‘या’ शेयरने 1 लाख रुपयांचे केले 2.45 कोटी, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

 

Anil Deshmukh-Sachin Vaze | सेवेत कायम करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितले होते 2 कोटी; ED ला दिलेल्या जबाबात सचिन वाझेचा दावा

 

Jammu & Kashmir | नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानची घुसखोरी हाणून पाडली; BSF ने केला दोघांचा खात्मा, 36 किलो ड्रग्स जप्त

Must Read
Related News