Lata Mangeshkar | लता मंगेशकरांच्या तब्येतीत सुधारणा; वेन्टीलेटर काढण्यात आलं, कुटुंबाने मानले चाहत्यांचे आभार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मंगेशकर कुटुंबियांतर्फे (Mangeshkar Family) शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) अद्याप आयसीयुत (ICU) उपचारासाठी असल्या तरी त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी त्यांना एक्स्टूबेशनची ट्रायल (Extubation Trial) घेण्यात आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital, Mumbai) डॉ. प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करीत आहेत.

 

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी माहिती (Health Update) दिली आहे. वयामुळे त्यांना बरे होण्यास वेळ लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, सध्या लतादीदींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे चाहते आणि सर्व सेलिब्रिटी त्यांच्या प्रकृतीसाठी सतत प्रार्थना (Prayers) करत आहेत.

लता मंगेशकर यांची प्रकृती सुधारावी म्हणून त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रर्थनेसाठी मंगेशकर कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहेत. लता मंगेशकर या 92 वर्षाच्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण (Corona Infection) झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट्स दिल्या जातात. आज दिलेल्या माहितीनुसार लतादीदींची प्रकृती हळूहळू सुधारत आहे.

 

Web Title :- Lata Mangeshkar | lata mangeshkar health update remove ventilator for while

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

How To Increase Breast Size | ब्रेस्ट साईज वाढवणे आणि त्यास योग्य आकार देण्यासाठी रोज करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

 

Easy Ways To Reshape Breast | बाळाला स्तनपान दिल्याने बिघडतो ब्रेस्टचा शेप, जाणून घ्या रिशेप करण्याच्या 5 सोप्या पद्धती

 

Dhananjay Munde | केज नगर पंचायतीत धनंजय मुंडेंना जोरदार धक्का; भाजप काँग्रेसच्या साथीने करणार सत्ता स्थापन