Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असले तरी त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात येईल, असे सांगितले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) 92 वर्षीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले आहे.

 

ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समधानी (Dr Pratit Samdani) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना कोरोनासोबत न्यूमोनियाही (Pneumonia) झाला होता. त्यांचं वय पाहता, प्रकृती सुधारण्यास वेळ लागेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. रुग्णालयात लता दीदींना दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्या लवकर बऱ्या व्हाव्या, यासाठी प्रर्थना करा, असं आवाहनही डॉक्टरांनी केलं होते. लता दीदींच्या जगभरातील चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची प्रकृती सुधारत आहे.

 

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना रुग्णालयातून घरी सोडण्यापूर्वी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत का? याची खात्री डॉक्टरांना करुन घ्यायची आहे. लता दीदींची भाची रचना शाह (Rachna Shah) यांनी दीदींच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. दीदींची तब्येत स्थीर (Stable) आणि व्यवस्थित आहे. देवाची कृपा आहे. त्या लढवय्या आहेत. आपण त्यांना इतकी वर्षे ओळखत आहोत. त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे रचना शाह यांनी म्हटले.

 

Web Title :- Lata Mangeshkar | lata mangeshkars health updates she is stable and to return home after doctors advice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Uttarakhand Election 2022 | दिवंगत जनरल बिपीन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

Pune Crime | सुरक्षा रक्षक बनले ‘देवदूत’, डॉ. सतीश चव्हाण यांच्या अपहरण झालेल्या ‘स्वर्णव’ला सुखरुप पोहचवलं पालकांकडे