Lata Mangeshkar | ‘स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा’; मंगेशकर कुटुंबीयांनी केलं आवाहन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lata Mangeshkar | मागील काही दिवसांपासून स्वर कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाची बाधा (Corona Positive) झाली म्हणून लता मंगेशकर यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात (Breach Candy Hospital, Mumbai) दाखल करण्यात आलेय. अद्याप त्या आयसीयूमध्ये आहेत. मात्र अजुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं दिसत नाही. लता दिदींचं वय पाहता प्रकृती सुधारणा होण्यास वेळ लागत आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी काही चुकीच्या बातम्या दिल्या जाताहेत त्या कृपया करुन देऊ नयेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर (Anusha Srinivasan Iyer) यांनी दिली.

 

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या कुटुंबियांनी (Lata Mangeshkar’s family) लता दिदी लवकर बऱ्या व्हाव्यात अन् घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं असल्याची माहिती देखील अय्यर यांनी दिली आहे. दरम्यान, लता मंगेशकर या 92 वर्षाच्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मागील काही दिवसांपासून लतादीदीवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी त्यांचे कुंटूंब प्रार्थना करत आहे. तर संपुर्ण भारतीय देखील प्रार्थना करताना दिसत आहेत. लता मंगेशकर लवकर बऱ्या होऊन घरी परत याव्यात यासाठी सर्वजन त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.

 

Web Title :- Lata Mangeshkar | let us all pray for lata mangeshkar speedy recovery and return home mangeshkar family

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा