Lata Mangeshkar | ‘ लता दीदीसाठी घरात शिव रुद्र स्थापित केलं आहे, पूजा-पाठ केले जात आहेत’ – आशा भोसले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar | भारताची स्वर कोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना प्रकृतीच्या कारणास्तव मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital ) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोनाची (Corona) लागण झाली. तसेच न्यूमोनियाही झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल त्यांची बहीण सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
लता दीदींच्या (Lata Mangeshkar) खालावत जाणाऱ्या प्रकृतीबाबत येणाऱ्या बातम्यांबद्दल त्यांना विचारलं असता. एका वृत्ताबरोबर संवाद साधताना आशा भोसले म्हणाल्या की, ”नाही, नाही, मी अर्चना आणि उषा यांच्याशी तीस मिनिटांपूर्वीच बोलले आहे. आपण सर्वांनी दीदींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.’ ती आमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या आईसारखी आहे. त्यांच्या घरी (प्रभाकुंज, पेडर रोड) शिव रुद्र स्थापित केले आहे आणि त्यांच्या आरोग्यासाठी पूजा-पाठ केले जात आहेत.” असं आशा भोसले यांनी म्हटलं आहे.
–
”लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
मी ब्रीच कँडी इस्पितळाच्या अधिकार्यांशी बोललो ज्यांनी मला त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले.
मी त्यांना सांगितले की इस्पितळाच्या प्रवक्त्यांनी गायिकेच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत रहावे, कारण लोकांना त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचे आहे.
लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतरच इस्पितळ त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट देऊ शकेल,” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रविवारी दिली होती.
Web Title : Lata Mangeshkar | lord shiva rudras have been placed at lata mangeshkar house says asha bhosle
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे हि वाचा
Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमधून कांद्याचे पोते चोरणार्यास अटक
Nitesh Rane | नितेश राणेंना मोठा धक्का ! मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला