Lata Mangeshkar Memorial | लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्क येथे नाही तर ‘या’ ठिकाणी होणार, राज्य सरकारने केली घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांचे नुकतेच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. स्वर्गीय लता मंगेशकर यांचे स्मारक (Lata Mangeshkar Memorial) मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park Mumbai) व्हावे अशी मागणी भाजपने (BJP) केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) मुंबईतील कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University Kalina) जागेवर स्वर्गीय लता मंगेशकर यांचं स्मारक (Lata Mangeshkar Memorial) होणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक (Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत भारतरत्न लता मंगेशकर आणि अभिनेते रमेश देव (Actor Ramesh Dev) यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली (Tribute) वाहण्यात आली. या बैठकीत भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक (Lata Mangeshkar Memorial) उभारण्याबाबत चर्चा झाली. त्याअंती मुंबईतील सांताक्रुझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये (Mumbai University Kalina Campus) लतादीदींचे (Latadidi) स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे.

 

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या जागेवर 1200 कोटी रुपये किमतीच्या अडीच एकर जागेवर आंतरराष्ट्रीय (International) दर्जाचं स्मारक होणार आहे, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत अकादमी (Music Academy) असणार आहे.

राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक उभारावे अशी मागणी केली.
राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक बनवावं.
जनतेच्या या मागणीची तात्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणा स्थळ ठरेल.
यासंदर्भातील एक पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवून स्मारक उभारण्याची भावना लतादीदींच्या सर्व चाहत्यांचीही असल्याचे कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यामुळे याच जागी शिवाजी पार्कवर गानकोकिळा लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारुन त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात.
अशी नम्र विनंती मी कोट्यावधी संगीत प्रेमी व लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने करत असल्याचे राम कदम यांनी पत्रात म्हटले होते.

 

 

Web Title :- Lata Mangeshkar Memorial | lata mangeshkars international memorial to be held at kalina mumbai university maharashtra thackeray governments announcement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7142 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने

 

Sangli Crime | सांगलीत महिला पोलीसाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या