Lata Mangeshkar Passes Away | गानसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांचे उपचारादरम्यान निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Passes Away | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना (Corona) आणि न्युमोनियाची (Pneumonia) लागण झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती आज खुपच खालावली. रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असताना आज (दि. 6 फेब्रुवारी) त्यांची प्राणज्योत (Lata Mangeshkar Passes Away) मालवली. त्या 92 वर्षांच्या होत्या.

 

 

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर (Indore in Madhya Pradesh) येथे झाला. लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून काम करण्यास सुरू केलं. त्या वडिलांसोबत संगीत, नाटकात अभिनय करत होत्या. यानंतर 13 व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. भारत रत्न (Bharat Ratna), पद्मभूषण (Padma Bhushan) आणि दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यासारख्या पुरस्कारांनी (Award) त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांनी भारतातील वेगवेगळ्या भाषांमध्ये 30 हाजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी ‘अजीब दास्तां हैं ये’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘नीला आसमान सो गया’ आणि ‘तेरे लिए’ यासारखी कितीतरी लोकप्रिय गाणी गायली आहेत. (Lata Mangeshkar Passes Away)

 

 

Lata Mangeshkar Net Worth | सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या

 

 

लता मंगेशकर यांना हिंदी संगीतविश्वात ‘लता दीदी’ (Lata Didi Passes Away) म्हणून ओळखले जात होते. ‘भारतरत्‍न’ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी MS Subbalakshmi (1998) नंतर दुसऱ्या महिला कलाकार होत्या. हा पुरस्कार त्यांना 2001 साली मिळाला. लता मंगेशकर हे नाव ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स’मध्ये (Guinness Book of World Record) 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदवण्यात आले.

 

 

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale),
उषा मंगेशकर (Usha Mangeshkar), मीना मंगेशकर (Meena Mangeshkar)
आणि ख्यातनाम संगीतकार-गायक (Famous Musician Singer ) हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar) हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
लता ह्या आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य होते. लता मंगेशकरांना ‘गान कोकिळा’ असे म्हटले जात होते.
लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते.

 

Web Title :- Lata Mangeshkar Passes Away | Lata Mangeshkar Passes Away in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | 24 कोटी लोकांच्या पीएफ खात्यात आले पैसे, ईपीएफओने सांगितली घरबसल्या बॅलन्स चेक करण्याची पद्धत; जाणून घ्या

Diabetes | ब्लड शुगर लेव्हल चेक करण्यापूर्वी तुम्ही सुद्धा करत नाही ना ‘या’ 3 चूका, रिडिंगमध्ये होऊ शकते गडबड; जाणून घ्या

Multibagger Stock | तीन महिन्यात ‘हा’ शेयर रू. 5 वरून 129 रुपयांवर पोहचला, गुंतवणुकदारांच्या 50 हजाराचे केले 10.93 लाख रुपये