Lata Mangeshkar | लतादीदींच गाणं नसल्याने ‘मेरा नाम जोकर’ फ्लॉप?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाशिवाय भारतीय संगीत क्षेत्राचा (Indian Music) इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. बॉलीवूडवर (Bollywood) त्यांच्या आवाजाचा विलक्षण प्रभाव होता आणि तो पुढे कायम राहणार आहे. लतादीदींचा (Lata Didi) आवाज अनेकांसाठी शुभलक्षणी होता. तसेच त्यांचे नाव आपल्या चित्रपटासोबत असणे हे देखील अनेकांसाठी भाग्याचे समजले जात होते. बॉलिवूड मधील पहिले शोमन ओळखले जाणारे राज कपूर (Raj Kapoor) आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यातील नाते ही असेच होते. राज कपूर यांच्या प्रत्येक चित्रपटात लतादीदींचा आवाज ठरलेला होता. शंकर-जयकिशन (Shankar-Jaikishan) ही संगितकार जोणी आणि त्यासोबत लतांचा स्वर असे समिकरण बनले होते. यांनी संगित (Music) दिलेले आणि लतादीदींनी गायलेली गाण्यांचे चित्रपट सुपर हिट ठरले. मात्र, याला एक अपवाद ठरला तो ‘मेरा नाम जोकर’ (Mera Naam Joker) चित्रपट. राज कपूर यांचा हा बिग बजेट चित्रपट होता.

 

त्या काळात सर्वाधिक लांबीचा (3 तास 44 मिनिटे आणि 2 मध्यंतर) असलेला हा चित्रपट राज कपूर यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प होता. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची बालभूमिका असलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटाचे शुटींग तब्बल 6 वर्षे चालले. चित्रपटाचे आर्थिक गणीत बिघडल्यानंतर राज कपूर यांना आपले राहते घर देखील गहाण ठेवावे लागले होते. राज कपूर यांची स्वत:ची भूमिका, दिग्दर्शन, शंकर-जयकिशन यांचे संगीत असे सर्वकाही जमून आले होते. मात्र, याला अपवाद होते ते म्हणजे या चित्रपटात लता मंगेशकर यांचे एकही गाणे नव्हते. याला राज कपूर आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या वादाची पार्श्वभूमी होती. रॉयल्टीच्या (Royalty) मुद्यावरून दोघांमध्ये मतभेद झाले होते.

लतादीदींचा आवाज नसल्याने चित्रपट फ्लॉप
राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटात आशा भोसले (Asha Bhosle) यांनी गाणी गायली होती. राज कपूर यांचा हा महत्त्वकांक्षी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही. सिमी गरेवाल (Simi Garewal) यांचा बोल्ड सीन असलेल्या या चित्रपटाची खूप चर्चा झाली. तरीही थिएटरमध्ये हा चित्रपट गर्दी जमवण्यास अपयशी ठरला. त्यामुळे राज कपूर आर्थिक अडचणीत आले. लताचे गाणे नसल्याने आपला चित्रपट पडला. लता मंगेशकर या आपल्यासाठी लकी आहेत. त्या गायल्या नसल्यामुळे अपयश मिळाल्याचे राज कपूर यांना खात्री पटली.

 

राज कपूर-लता मंगेशकर जोडी पुन्हा जमली
मेरा नाम जोकर फ्लॉप ठरल्यानंतर राज कपूर यांच्याकडे मोठा चित्रपट करण्यासाठी आर्थिक पाठबळ नव्हते. मग स्वत:चा मुलगा ऋषीकपूरला हिरो म्हणून ‘बॉबी’ (Bobby) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल (Laxmikant-Pyarelal) यांनी संगित दिलं. तर चित्रपटातील गाणी अर्थातच लतादीदींनी गायले. पुढे हा चित्रपट हिट झाला, चित्रपटातील गाणी गाजली आणि लता या आपल्यासाठी लकी असल्याची प्रचिती राज कपूर यांना आली. यानंतर या दोघांनी पुढे अनेक चांगले चित्रपट दिले. यामध्ये राम तेरी गंगा मैली (Ram Teri Ganga Maili), हिना (Heena) या चित्रपटांसह नव्वदच्या दशकापर्यंत ही जोडी कायम राहिली.

 

राज कपूर-लता मंगेशकर मधील वादाचे प्रसंग गाजले
राज कपूर आणि लतादीदी यांच्यातील वादाचे प्रसंग फारच चर्चेत राहिले होते.
‘सत्यम शिवम् सुंदरम्’ (Satyam Shivam Sundaram) या चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar)
यांना संगीतकार (Musician) म्हणून घेणार असल्याचे राज कपूर यांनी सांगितले होते.
हे बोलणे झाल्यानंतर लता या संगीत कार्यक्रमासाठी विदेशात गेल्या होत्या.
इकडे राज कपूर यांनी आपला निर्णय बदलला आणि हृदयनाथ यांच्याऐवजी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना संगितकार म्हणून घेतले.
परदेशातून परत आल्यानंतर लतादीदींना हे समजल्यावर त्या चिडल्या. त्यांनी पुन्हा राज यांच्यासाठी गाणार नसल्याचा निर्णय घेताल.
अखेरीस लक्ष्मीकांत यांनी मध्यस्थी केली. प्रत्यक्ष गाणे रेकॉर्डिंगच्या वेळी राज कपूर यांनी येऊन लताजींना मनवले.
या चित्रपटातील गाणी देखील खूप प्रसिद्ध झाले.

लतादीदींमुळे संगीत क्षेत्रात अनेक नवख्या कलाकारांना, संगीतकारांना संधी मिळाली.
परंतु राज कपूर सारख्या निर्मात्याला, अभिनेत्याला त्या आपल्यासाठी लकी वाटाव्यात असा लतादीदींचा दबदबा होता.
अशा या गानस्रम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (रविवार) सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Lata Mangeshkar Passes Away)

 

Web Title :- Lata Mangeshkar | Raj Kapoor’s movie mera naam joker was a flop as lata mangeshkar not sung for it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | बड्या घरच्या 2 उच्चशिक्षित महिलांनी उचललं ‘हे’ टोकाचं पाऊल, वाढदिवशी घडलं भयानक, प्रचंड खळबळ

 

Maharashtra Public Holiday | लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

Lata Mangeshkar | ‘त्या’ वेळी लतादीदींचा आवाज ऐकून पंडित नेहरुंनाही अश्रू अनावर झाले…