Lata Mangeshkar-Sachin Tendulkar | लतादीदींनी सांगितला होता सचिन तेंडूलकरबद्दलचा भावूक किस्सा ! म्हणाल्या होत्या – ‘जेव्हा सचिन मला पहिल्यांदा आई म्हटला होता…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Lata Mangeshkar-Sachin Tendulkar | भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी (Lata Mangeshkar) आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्याभरापासून लतादीदी रुग्णालयात होत्या. त्यांच्या निधनानं संपूर्ण देशावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Lata Mangeshkar-Sachin Tendulkar)

 

लता मंगेशकर यांचं पहिलं प्रेम संगीत होत. मात्र संगीताव्यतरिक्त लतादीदींना क्रिकेटची सुद्धा आवड होती. त्यांनी क्रिकेटचे सामने पाहण्याची कोणतीच संधी सोडली नाही. दीदींचा आवडता क्रिकेटर म्हणजे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिनबद्दल लतादीदी अनेकदा आपलं मत व्यक्त करत असायच्या. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर आहे. ते दोघं त्यांचा प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे. लता मंगेशकर सचिनसाठी आईसारख्या होत्या. (Lata Mangeshkar-Sachin Tendulkar)

 

लता मंगेशकर यांनी स्वत:हा सचिनबद्दल असलेल्या नात्याबद्दल सांगितलं. सचिननं पहिल्यांदा आई म्हटलं होतं. तो दिवस त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक होता. त्यांनी एक किस्सासुद्धा सांगितला. त्या म्हणाल्या, “मी तो दिवस कधीच विसरणार नाही. जेव्हा मला पहिल्यांदा सचिनंन आई म्हटलं होतं. माझ्यासाठी ते एकदम थक्क करणारं होतं. कारण सचिन असं बोलेल, अशी मला अपेक्षा नव्हती. त्याचा तोंडून हे शब्द ऐकून मी भावूक झाले. सचिनसारखा मुलगा मिळाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजल.”

 

दरम्यान, लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात 1942 मध्ये केली होती. लतादीदींनी 900 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणं गायिले आहेत. लता मंगेशकर यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

 

Web Title :- Lata Mangeshkar-Sachin Tendulkar | lata mangeshkar was given the status of mother by sachin tendulkar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा