Lata Mangeshkar | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही, अद्यापही आयसीयुमध्ये उपचार सुरू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Lata Mangeshkar | भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या प्रख्यात गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना (Corona) आणि न्युमोनियाची (Pneumonia) लागण झाल्याने त्यांना काही दिवसांपुर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital Mumbai) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू आहेत. आता लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत अजुनही सुधारणा नसल्याची माहिती समोर येत आहे.

 

मागील काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारांना थोडाबहुत प्रतिसाद मिळत असला तरी अपेक्षेइतकी प्रकृतीत सुधारणा नाही. उपचार करणा-या डॉक्टरांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. लतादीदी अद्याप आयसीयूमध्ये असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर वारंवार लक्ष ठेवून आहेत. परंतु, त्यांचे वय पाहता बरे होण्यास वेळ लागत आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samadani) यांनी दिली आहे.

 

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या कुटुंबियांनी (Lata Mangeshkar’s Family) लतादिदी लवकर बऱ्या व्हाव्यात अन् घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केलं असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर (Anusha Srinivasan Iyer) यांनी दिली आहे. दरम्यान, संपुर्ण भारतवासीय लतादिदी बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रार्थना करताना पाहायला मिळत आहेत.

 

Web Title :- Lata Mangeshkar | senior singer and bharatratna lata mangeshkar health is not well she is in ICU of Breach Candy Hospital Mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा