‘लॉकडाऊन’मध्ये लता मंगेशकरांनी शेअर केला 98 वर्षांपूर्वीचा ‘खास’ फोटो ! सोशलवर होतोय ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी एक फोटो थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. खास बात अशी की, हा फोटो 98 वर्षे जुना आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांचा वडिलांचा आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “नमस्कार 14 मे 1922 म्हणजेच 98 वर्षांआधी, माझ्या वडिलांना श्रीमत जगदगुरू श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी गंगापूर पीठ नाशिकनं आपल्या पवित्र हातांनी संगीत रत्न उपाधी दिली. ही आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे.” लता मंगेशकर यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

लता मंगेशकर यांचे वडिल संगीत गुरू दीनानाथ मंगेशकर प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि रंगकर्मी होते. लता मंगेशकर यांना संगीताचं शिक्षण सर्वात आधी वडिलांनी दिलं. त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडिलच होते. त्या 5 वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांनी लता यांना संगीत शिकवायला सुरुवात केली होती.