‘या’ कारणामुळे मास्टर शेफ विकास खन्ना यांचे लतादीदींनी मानले ‘आभार’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी सेलिब्रिटी मंडळी पुढे सरसावली आहेत. अनेक जण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मदत करत आहेत. दरम्यान प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना याने पुण्यातील एका रुग्णालयाला एक हजार पीपीई किट्सची मदत केली. यासाठी लता मंगेशकर यांनी त्याचे आभार मानले आहेत.

विकास खन्ना याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला एक हजार पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्शन इक्विवमेंट्सची मदत केली. यासाठी लता दीदींनी त्याचे आभार मानले. स्टार शेफ विकास खन्ना तुम्ही आमच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत केली. या मदतीसाठी संपूर्ण मंगेशकर कुटुंब आपले आभारी आहे. अशा आशायाचे ट्विट लता मंगेशकर यांनी केले होते. यावर विकास खन्नाने देखील प्रतिक्रिया दिली. लतादीदी तुमच्याकडे पाहून आम्ही प्रेरीत होतो.

आमचा जीव देखील तुमच्यासाठी हाजीर आहे. अशा आशयाचे ट्विट त्याने केले. मुंबई प्रमाणे पुण्यात देखील कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर विकासने केलेली मदत नक्कीच उल्लेखनीय आहे. विकास आणि लतादीदी या दोघांचीही ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.