‘सीआयडी’ मालिका पुन्हा सुरू व्हावी, लता मंगेशकरांनी व्यक्त केली ‘इच्छा’

पोलीसनामा ऑनलाइन – टेलिव्हिजनवर गेल्या 22 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी सीआयडी मालिका पुन्हा सुरू व्हावी अशी इच्छा भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी अभिनेते शिवाजी साटम यांना वाढदिवसानिमित्त ट्विट करत शुभेच्छा दिल्या.

अनेक वर्षांपासून सुरू असणारी लोकप्रिय मालिका कोणती असे कोणालाही विचारल्यास ‘सीआयडी’ हे नाव नक्कीच ऐकायला मिळत होते. मुले लहानाची मोठी झाली तरी या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. मालिकेत एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे लतादीदींनी ट्विट करुन ‘नमस्कार. आज सीआयडी मालिकेचे एसीपी प्रद्युमन म्हणजेच शिवाजीराव साटम यांचा वाढदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सीआयडी मालिका पुन्हा सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे.’ या ट्विटसोबतच लतादीदींनी शिवाजी साटम यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. सीआयडी या मालिकेतील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे ‘एसीपी प्रद्युम्न सिंह’. अभिनेते शिवाजी साटम गेली 22 वर्षे ‘एसीपी प्रद्युम्न’ ही भूमिका साकारत आहेत. ते एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये इतके मानधन घ्यायचे. विशेष म्हणजे शिवाजी साटम हे ‘सीआयडी’ मालिकेसाठी महिन्यातून फक्त 15 दिवस काम करायचे.