लता मंगेशकरांनी आपल्या ‘बिट्टू’ला केलं बर्थडे ‘विश’, चाहत्यांनी केल्या ‘अशा’ कमेंट्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलवू़डच्या महान गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या करिअरच्या काळात अनेक एक से बढकर एक गाणी गायली आहेत. ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर असतात. आज त्यांनी आपल्या पाळलेल्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला. बिट्टू असं या कुत्र्याचं नाव आहे. बिट्टू आता पाच वर्षांचा झाला आहे. खुद्द लता मंगेशकर यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

या आनंदाच्या क्षणी लता मंगेशकर यांनी बिट्टूचे फोटो शेअर करत त्याच्या वाढदिवसासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. बिट्टूचे फोटो शेअर करताना लता मंगेशकर म्हणतात, “आज आमच्या बिट्टूचा पाचवा वाढदिवस आहे. Happy Birthday Bittu” लता मंगेशकर यांचं ट्विट सध्या सोशलवर चर्चेत असून व्हायरल होताना दिसत आहे.

लता मंगेशकर यांची ही गोष्ट चाहत्यांनाही खूप आवडली आहे. अनेकांनी या पोस्टनंतर लता मंगेशकर यांचं कौतुक केलं आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या बिट्टूला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. एकीकडे बिट्टूवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच काहींनी त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.