लता मंगेशकर यांचा जीवनपट उलघडणार मीना मंगेशकर -खर्डीकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

करोडो लोकांच्या मनावर आपल्या सुमधूर आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान असणाऱ्या महान गानसम्राज्ञी लता मंगेशकर याचा जीवन प्रवास त्यांची बहिण मीना मंगेशकर -खर्डीकर या सर्वांसमोर उघड करणार आहे. त्यांनी लिहिलेले मोठी तिची सावली हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. लता मंगेशकर या येत्या २८सप्टेंबरला ९० व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. त्या निमित्ताने हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2ae92bd-bca0-11e8-b9b8-7d654cefd6ee’]

हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर-खडीकर, प्रकाशक आप्पा परचुरे, अविनाश प्रभावळकर (अध्यक्ष-हृदयेश आर्ट्स) यांच्या उपस्थितीत प्रभुकुंज येथे ‘हृदयेश आर्ट्स’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर  यांच्या ९० व्या वषार्तील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाची घोषणा करण्यात आली. मीना मंगेशकर-खडीकर यांनी ह्या पुस्तकाचे लेखन केलेले असून परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

पुण्यातील गदिमा स्मारकाच्या कामात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील अनेक मनोरंजक घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे. हा पुस्तक प्रकाशन सोहळा २८ सप्टेंबर रोजी, लोकसभेच्या अध्यक्षा  सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंत्री विनोद तावडे या सोहळ्याचे मुख्य अतिथी असणार असून सोहळ्याचे अध्यक्षस्थान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे भूषविणार आहेत. पं. शंकर अभ्यंकर ह्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असून आप्पा परचुरे आणि प्रवीण जोशी यांच्यासमवेत अनेक मान्यवर सोहोळ्यास उपस्थित राहणार आहेत.