नरेंद्र मोदींच्या कवितेला लतादिदींचा आवाज

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर केलेल्या भाषणात एक कविता ऐकवली होती. ती एकल्यावर त्या कवितेच्या ओळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावल्या, त्यामुळे त्यांनी ती कविता स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केली आहे. तसेच त्याचा व्हिडीओ त्यांनी पंतप्रधान नोदी यांना ट्विट केला आहे.

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांचे ट्विट रिट्विट करत म्हटले आहे की, आपण या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केलेलं स्नेह आणि प्रेम मला प्रेरनास्त्रोत आहे.’ असे म्हणत लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत.

या व्हिडीओच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांनी कवितेबद्दल प्रस्तावना सांगितली आहे. त्यात ‘काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण मी ऐकत होते. त्यात त्यांनी एका कवितेच्या ओळी सादर केल्या होत्या. त्यावेळी मला असं वाटलं की त्या कवितेच्या ओळी या प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनातलं सांगत आहेत. मला ती कविता फार आवडली. त्यामुळे मी ती कविता रेकॉर्ड केली आहे. आज मी ती कविता देशाच्या जवानांना आणि जनतेला समर्पित करते’ असे लतादिदींनी म्हटले आहे.