Late Night Dinner Side Effects : तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का ? होऊ शकतात आरोग्यासंबंधित ‘या’ 5 गंभीर समस्या, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :- नेहमीच असे म्हटले जाते की रात्रीचे जेवण वेळेवर करावे, परंतु बदललेल्या जीवनशैलीमुळे लोक बर्‍याचदा रात्री उशीरा जेवतात (Late Night Dinner ) . यामुळे बर्‍याच गंभीर समस्या उद्भवू शकतात. रात्री उशिरा खाल्ल्याने (Late Night Dinner ) तुम्हाला कोणत्या आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात हे जाणून घेऊया.

1. वजन वाढण्याचा धोका

रात्री उशिरा खाल्ल्यास आपले वजन अधिक वाढण्याची शक्यता असते. वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी, आपण किती कॅलरी घेत आहात याचा काही फरक पडत नाही तर आपण या कॅलरीज कोणत्या वेळी घेत आहात हे महत्त्वाचे आहे. रात्री उशिरा जेवण केल्यामुळे चयापचय क्रिया हळू होते, ज्यामुळे कॅलरी बर्न होत नाही आणि वजन वाढू लागते.

2. खराब पचनक्षमता

जर आपण रात्री उशिरा जेवण करत असाल तर आपल्याला हार्ट पेन, अ‍ॅसिडिटी आणि छातीत दुखणे अशा काही समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच असे म्हटले जाते की रात्रीचे जेवण झाल्यावर थोडावेळ चालावे जेणेकरून अन्नाचे पचन होईल. झोप आणि जेवण यांमध्ये कमीतकमी 2-3 तासांचे अंतर ठेवले पाहिजे.

3. झोपेची समस्या

जर आपण रात्री उशिरा जेवण केले तर आपल्याला झोपेसंबंधी समस्या देखील उद्भवू शकते. रात्री कमी झोप लागल्यामुळे, दुसर्‍या दिवशी शरीर थकलेल्या स्वरूपात असते. रात्री निरोगी शरीरासाठी कमीतकमी 8 तास झोपणे आवश्यक आहे आणि असे शक्य व्हावे यासाठी रात्रीचे जेवण वेळेवर झाले पाहिजे.

4. रक्तदाब वाढणे

चुकीच्या वेळी जेवल्यामुळे आणि झोपेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात, ज्यामुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो. एका अभ्यासानुसार रक्तदाबाचा धोकाही अनेक पटींनी वाढतो.

5. मानसिक आरोग्यावर परिणाम

झोप न लागल्यामुळे आपली चिडचिड होते आणि आपला मूड स्विंग होऊ लागतो. झोपेच्या कमतरतेमुळे कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड होते आणि चिडचिडेपणामुळे तुमची मनःस्थिती खराब होऊ लागते.