‘या’ 9 कारणांमुळे मासिक पाळी उशिरा येते, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – बहुतेक स्त्रिया अशी तक्रार करतात, की त्यांची मासिक पाळी वेळेवर येत नाही. आपण गर्भधारणेची योजना आखत नसल्यास आणि तरीही आपली मासिक पाळी उशिरा येत असल्यास तर बरीच कारणे आहेत तर चला या ९ कारणांबद्दल जाणून घेऊया…

ताण
तणावाचा मासिक पाळी आणि शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. तणावमुळे जीएनआरएच नावाच्या हार्मोन्सची मात्रा कमी होते, ज्यामुळे ओव्हुलेशन किंवा मासिक पाळी येत नाही. नियमित मासिक पाळी परत आणण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आजार
अचानक ताप, सर्दी, खोकला किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळे मासिक पाळी उशिरा येते. हे तात्पुरते होते आणि एकदा आपण आजारातून बरे झाल्यावर आपली मासिक पाळी पुन्हा नियमित होते.

नित्यक्रमात बदल
वेळापत्रक बदलणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, शहरातून बाहेर पडणे किंवा लग्नाच्या वेळी किंवा घरात एखाद्या कार्यक्रमामुळे आपली दिनचर्या बदलते.तेव्हा असे होते पण जेव्हा शरीराला या नवीन शेड्यूलची सवय लागते किंवा जेव्हा आपण सामान्य रूटीनकडे परत येतो तेव्हा मासिक पाळी देखील नियमित होतो.

स्तनपान
अनेक स्त्रिया स्तनपान देतात त्यामुळे वेळेवर मासिक पाळी सुरू होत नाही.

जन्म नियंत्रण गोळ्या –
जन्म नियंत्रण गोळ्या आणि काही इतर औषधे देखील मासिक पाळीची चक्र बिघडवतात. अशी औषधे घेतल्यावर एकतर मासिक पाळी कमी होतो किंवा खूप लवकर येतो किंवा ती मुळीच थांबत नाही, अशा वेळी डॉक्टरांशी संपर्क साधा.

लठ्ठपणा
लठ्ठपणा हे देखील मासिक पाळी अनियमित येण्याचे कारण असू शकते. ही समस्या कमी वजनाच्या लोकांना देखील होते; परंतु लठ्ठपणा याला मुख्य कारण आहे.

पूर्व रजोनिवृत्ती
स्त्रियांच्या जीवनातील मासिकपाळी बंद होतो तो काळ पूर्व रजोनिवृत्ती तो काळ जसा जवळ येतो तेव्हा मासिक पाळी अनियमित होते.

अशक्तपणा
अशक्तपणा हे देखील मासिक पाळी अनियमित होण्याचे कारण आहे. नियमित कालावधीसाठी निरोगी वजन आवश्यक आहे.

थायरॉईड
गळ्यातील थायरॉईड ग्रंथी मेटाबॉलिज्म नियंत्रित करते. शरीराच्या बर्‍याच फंक्शन्समध्येही याची भूमिका असते. आपल्याला थायरॉईड संबंधित कोणतीही समस्या असल्यास ते मासिक पाळी देखील प्रभावित करते. आपल्याला थायरॉईडची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.