संगीतकार वाजिदच्या निधनानंतर पत्नी ‘कमलरूख’चा कुटुंबियांवर आरोप, म्हणाली – ‘धर्म परिवर्तनासाठी भाग पाडले’

नवी दिल्ली : कोरोना काळात आपण अनेक कलाकारांना मुकलो आहोत. यापैकी एक नाव संगीत जगतातील प्रसिद्ध जोडी साजिद-वाजिद पैकी वाजिदचे सुद्धा आहे. वाजिद खानचे दिर्घ आजाराने 1 जून 2020 ला निधन झाले आहे. यानंतर साजिद-वाजिद ही प्रसिद्ध जोडी कायमसाठी तुटली गेली. पण वाजिदच्या निधनानंतर त्याची पत्नी कमलरुखचे जीवन अडचणींनी भरल्याचे दिसत आहे. कमलरुखने वाजिदच्या कुटुंबावर छळाचा आरोप केला आहे.

वाजिद खानची पत्नी कमलरुखने सोशल मीडियावर या गोष्टीचा खुलासा केला आहे की, तिला वाजिदच्या कुटुंबियांकडून जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यासाठी सांगितले जात आहे. ती आपल्या पतीच्या निधनातून अद्याप सावरलेली नसताना, दुसरीकडे तिला कुटुंबाकडून त्रास दिला जात आहे.

कमलरुखने पत्रात आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले आहे की, मी पारसी होते आणि ते मुस्लिम होते. असे समजा की आम्ही कॉलेज स्वीटहार्ट्स होतो. जेव्हा आम्ही विवाह केला तेव्हा स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत केला आहे. मला यावरचा अनुभव सांगायचा आहे की, कशाप्रकारे मला इंटरकास्ट मॅरेज केल्यानंतर धर्माच्या आधारावर भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. हे खुप लाजिरवाणे आहे. आणि सर्वांचे डोळे उघडणारे आहे. आता हे पहाणे महत्वाचे आहे की, यावर वाजितच्या कुटुंबियांकडून काय प्रतिक्रया येते.

बॉलीवुडची सुपरहिट जोडी तुटली
वाजिद खानला 31 मे 2020 रोजी प्रकृती बिघडल्याने हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आणि दुसर्‍याच दिवशी म्हणजे 1 जून 2020 ला वाजिद खानचे निधन झाले. साजिद-वाजिदच्या जोडीने बॉलीवुडला असंख्य सुपरहिट गाणी दिली. दबंग सीरीज, पागलपंती, हीरोपंती, मैं तेरा हीरो, जुडवा 2, चश्मे बद्दूर, हिम्मतवाला, एक था टायगर, हाऊसफुल 2, वीर, वॉन्टेड, गॉड तुस्सी ग्रेट हो, वेलकम, पार्टनर, मुझसे शादी करोगी, तेरे नाम, हम तुम्हारे हैं सनम आणि हैलो ब्रदर सारख्या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे.