Cheapest Automatic Cars : ‘या’ आहेत भारतातील सर्वात ‘स्वस्त’ ऑटोमॅटिक कार, 4.53 लाखांच्या सुरूवातीच्या किंमतीवर मिळते 22kmpl चे ‘मायलेज’

पोलीसनामा ऑनलाईन : भारतात गेल्या काही वर्षांत ऑटोमॅटिक वाहनां ( Automatic Cars)चा कल खूप वेगाने वाढत आहे, सतत वाढत जाणारी रहदारीची समस्या आणि कम्फर्ट झोनमध्ये वाहन चालविण्याच्या इच्छेमुळे लोक ऑटोमॅटिक वाहनां( Automatic Cars) कडे आकर्षित होत आहेत. जर आपण पाहिले तर बाजारात अशी जवळपास 90 वाहने आहेत, जी एएमटी (AMT) गिअरबॉक्सने सज्ज आहेत. सध्या आम्ही तुमच्यासाठी काही एन्ट्री-लेव्हलच्या ऑटोमॅटिक वाहनांची यादी घेऊन आलो आहोत. ज्यांची किंमत 6 लाखांच्या आत आहे.

Renault Kwid:

रेनोच्या या कारचा 1.0-लीटर RXL व्हेरिएंट एएमटीसह येतो. या कारची सुरुवातीची किंमत भारतीय बाजारात 2.94 लाख रुपयांपासून ते 5.07 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये त्याच्या एएमटी व्हेरिएंटची किंमत 4.53 लाख रुपये आहे. Kwid ही भारतातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार आहे. जी एएमटी गिअरबॉक्ससह 22kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hyundai Santro:

सँट्रो भारतीय बाजारात एएमटी गिअरबॉक्ससह केवळ 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तिचा बेस-स्पॅक Era Executive वगळता इतर सर्व व्हेरिएन्ट्स एएमटी गिअरबॉक्ससह सादर केले गेले आहेत. तसे ह्युंदाई सॅंट्रोची किंमत 4.57 लाख रुपयांपासून 6.25 लाख रुपयांपर्यंत ठेवली गेली आहे. ज्यामध्ये तिच्या एएमटी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 5.58 लाख रुपये आहे. कंपनीचा असा दावा आहे की ह्युंदाई सॅंट्रो एएमटी 20.3 kmpl पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.

Maruti Wagon-R:

मारुती वॅगन-आर ही भारतातील एक लोकप्रिय कार आहे. ही 2 व्हेरिएंटमध्ये एएमटी गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. या कारची किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते. वॅगनआरला 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.2-लिटर पेट्रोल मोटरचा पर्याय मिळतो. एएमटी व्हेरिएंट केवळ 1.0 लिटर इंजिनसह उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बघितले तर कंपनी असा दावा करते की वॅगनआर 21.79 kmpl पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.

Maruti Celerio:

मारुती सुझुकी सेलेरिओ सध्या तीन व्हेरिएन्ट्समध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये एएमटीचा पर्याय दोन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. Celerio BS6 ची किंमत 4.41 लाख ते 5.68 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर या कारच्या एएमटी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 5.23 लाख रुपये ठेवली गेली आहे. मायलेजबद्दल बघितले तर कंपनीचा असा दावा आहे की सेलेरिओ एएमटी 21.63 kmpl पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.